चतुर्श्रुंगी मंदिर
पुण्याच्या उत्तरेला ,पुण्यापासून ५ किमी वरती चातुश्रुन्गीची टेकडी आहे .येथे चातुश्रुन्गीची देवीचे प्रसिद्ध मंदिर असून त्याविषयी एक अख्याएका सांगितली जाते . त्यानुसार ,दुर्लभशेठ नावाचे पुण्याचे व्यापारी होते ते नित्य नेमाने नासिक च्या सप्तशृंगी ची यात्रा करत असत . पण नंतर वय वाढल्याने त्यांना ते शक्य होईना झाले .एकेदिवशी देवी त्यांच्या स्वप्नात आली आणि तिने पुण्याच्या टेकडीवर राहाण्याच आश्वासन दिल . त्यानुसार दुर्लभशेठाणी १७८६ साली हे मंदिर बांधल .
मंदिर हे टेकडीवर असून जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत .मंदिराचे बांधकाम अतिशय सुरेख आणि सुंदर आहे . मंगळवारी आणि शुक्रवारी दर्शनासाठी गर्दी असते . नवरात्री मधे अश्विन महिन्यात येथे मोठी यात्रा भरते .
0 comments:
Post a Comment