आगाखान राजवाडा हा येरवड्यामधे ,बंद गार्डन पुलापासून १ ते २ किमी अंतरावर पुणे – नगर रोड वर येतो .आगाखान राजवाड्याचे १९ एकरावर पसरलेला असून त्यापैकी ७ एकर जमीन आगाखान राजाने १९६९ साली गांधी नतिओनल मामोरीअल ला दिली . आगाखान राजवाडा हा स्थापत्य्शात्राचा उत्क्रष्ट नमुना आहे .
८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधीनी “भारत छोडो ” चा नारा दिला .त्यानंतर महात्मा गांधीना अटक करून पुण्यात आगाखान राजवाड्यामधे ठेवण्यात आले .त्यानंतर २ ते ४ दिवसांनी कस्तुरबा गांधीनी मुंबई मधे आंदोलन उभारलं त्यामुळे त्यांनादेखील आगाखान राजवाड्यामधे आणण्यात आले .महात्मा गांधींचे सचिव महादेवभाई देसाई यांचे हृदयविकाराने १५ ऑग १९४२ रोजी निधन झाले . २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबा गांधीचे देखील निधन झाले .त्यांची समाधीस्थळे राज्वाद्याच्यासमोर आहेत . महात्मा गांधी त्या समाधींचे दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नसत.
राजवाड्यामध्ये ५ सभागृह आहेत .स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास चित्राच्या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे .गांधीजीनी वापरलेल्या वस्तू ,बेड ,डेस्क ,कपडे येथे काळजीपूर्वक ठेवण्यात आले आहेत. हा राजवाडा वर्षातील ४ दिवस दिवाळी ,मोहरम ,धुलीवंदन आणि अनंतचतुर्दशी सोडून सर्व दिवशी पाहण्यास उपलब्ध असतो . त्यासाठी फक्त ५ रुपये शुल्क आहे . स्वातंत्र्य लढ्याबद्दल आपणास जाणून घ्यायचं असल्यास एकदा तरी नक्की भेट द्या .हि माहिती खास मेड इन पुणे च्या वाचकासाठी ..आवडल्यास नक्की शेअर करा ..आम्हाला आपल्या प्रतिसादाची आवश्यकता आहे .
0 comments:
Post a Comment