,

जेजुरी

जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यदैवत असून इ. स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले.
 सभामंडप व इतर काम इ. स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ. स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ. स. १७७० मध्ये पूर्ण झाले.
              निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रीत्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा.कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

देऊळ व परिसर:-
जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता.
 दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.
देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे.यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.
खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत.

खंडोबाची यात्रा व जत्रा:-
खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस,
 मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते
 दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते.कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे,
 बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वर्‍हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात.खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात.


सर्वांचे आभार..!

मेड इन पुणेच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार..!
आज मराठी भाषेचा वापर सगळीकडे सर्रास होत असताना,
संसाकृतिक वारसा असलेल्या पुणे शहराबद्दल आणि परीसराबद्दलची माहिती मराठीत उपलब्ध असू नये याच आचार्य वाटत....
हीच खंत घेवून हा केलेला खटाटोप...तुम्हाला नक्की आवडेल हि आशा...

तसेच आपल्याकडे काही लेख,फोटो असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते आम्ही आपल्या नावासहित प्रसिद्ध करू.
आपले पुण्याविषयी असलेले मत आपण madeinpune@gmail.com या मेल वरती पाठवू शकता.
तसेच आपल्याला काही बदल सुचवायचे असल्यास तेही सुचवू शकता.
त्यासाठी येथे टिचकी मारा.

काम चालू आहे

ह्या पानाचे काम चालू आहे..लवकरच जोडण्यात येईल...

आपल घर
,

पार्वती

पार्वती:-

         पार्वती हे पुण्यातील सर्वात उंच ठिकाण असून येथून आपण सर्व पुणे पाहू शकतो .रात्रीच्या  वेळी  तर  हे  दृश्य  अतिशय  विलोभनीय  दिसते .पार्वती  वरील मंदिरे  हे  स्थापत्यशास्त्राचा  उत्कृष्ठ   नमुना  आहे .हे  एक  पुण्याच्या  गर्दीपासून  दूर  शांत  असे  ठिकाण  असून पुणेकरासाठी   अशी  ठिकाणे  अगदी  हाकेच्या  अंतरावर  आहेत. पर्वतीला  एकूण  १०३  पायऱ्या  असून  पुण्यातील  काही  नागरिक  येथे  दररोज व्यायामासाठी साठी  येतात. येथे  देवेश्वराचे  मंदिर  असून ,कार्तिकेय ,विष्णू  आणि  विठठलाचे  देखील मंदिरे  आहेत . त्याचबरोबर  पेशवांच्या इतिहास  सांगणारे  १  संग्रालय  देखील  आहे.त्यासाठी  ५  रुपये  अशी  नाममात्र  प्रवेश  फी  आहे .
         संग्रलायाच्या  बाजूलाच  श्रीमंत  नानासाहेब  पेशव्यांचे  समाधी  स्थान  आहे  ज्यांनी  येथे  शेवटचा  श्वास  घेतला .सर्व  गोंगाटापासून  शातंता  आणि  रात्रीच्या  वेळी   विलोभनीय  दिसणारे  पुण्याचे  दृश्य , हे  सगळ  पाहायचं  असेलतर  पार्वतीला  नक्की   भेट  द्या  आणि  आपल्या  प्रतिक्रिया  नक्की  कळवा


,

शनिवार वाडा


 शनिवार वाडा:-

शनिवार वाडा ही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आहे. हे महाराष्ट्राचे पंतप्रधान श्रीमंत पेशवे यांचे निवासस्थान होते.

शनिवार वाडा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी बांधला.त्याच्या बांधकामाची सुरूवात जानेवारी १०, १७३० रोजी झाली. श्रीमंतांनी स्वत: लाल महालातून माती आणून त्याची पायाभरणीची सुरूवात केली. बांधकाम वेगाने करण्यात आले. अखेर तत्कालीन १६,०१० रुपये खर्चून, शनिवार वाड्याचे बांधकाम जानेवारी २२, १७३२ रोजी पूर्ण झाले.

हा वाडा बांधण्यासाठी हीच जागा निवडण्यासंबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा एक ससा त्या ठिकाणी एका कुत्र्याचा पाठलाग करतांना बाजीराव पेशव्यांच्या दृष्टीस पडला त्यांना तो शुभ शकुन वाटला. येथे वाडा बांधल्यास केव्हाही पराभवास सामोरे जावे लागणार नाही असे समजून त्यांनी हा निर्णय घेतला. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे मूळच्या स्वरूपातील वाडा आपण पाहू शकत नाही. या वाड्याच्या चौथर्यावर बसविलेल्या छोट्या फलकावरून एकेकळी येथे असलेल्या गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, दिवाणखाना, कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.

जेव्हां श्रीमंत शाहू महाराजांना कळले की पेशवे पुण्यात मोठा किल्लेवजा वाडा बांधत आहेत, तेव्हा त्यांच्या सरदारांना भीती वाटली की पेशवे शिरजोर होऊ पहात आहेत. तेव्हा शाहू महाराजांनी पेशव्यांना लिहिले की तट मातीचे नाही, छातीचे करायचे असतात.

शनिवारवाड्याचे अंतरंग:-

शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते.

सौजन्य:- www.wikipedia.com


,

दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यात भारतातील एका हिंदू देव गणपती बाप्पा यांना समर्पित केले आहे.हे मंदिर ऐतिहासिक शनिवारवाडा किल्ल्यापासून खूपच जवळ असून हा वाडा मराठा पेशावांचे प्रशासक  मुख्यालय होते.हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मंदिर असून या ठिकाणी दूर दूरवरून  हजारो भाविक दर्शनासाठी येतात.मोठमोठ्या हस्ती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दर वर्षी या ठिकाणी गणेश उत्सवाचा वेळी भेट देतात.मुख्य गणपतीची मूर्ती वर १ करोड रुपयाची आहे.

मंदिराचा इतिहास

१८९३ मधे,दगडूशेठ हलवाई नावाचा एक श्रीमंत मिठाई विक्रेत्याकडून या मंदिराची स्थापना करण्यात आली.हलवाईचा मुलगा त्याचा आधीचा वर्षी हरवला होता त्यनंतर त्यांचा गुरूचा अद्येनुसार त्यांनी गणपती आणि दत्ताचा मूर्तींची स्थापना केली.त्यानंतर त्यांनी हलवाई गणपती संस्थेची स्थापना केली.बाल गंगाधर टिळक यांनी इंग्रजांचा काळात सर्व लोक एकत्र यावेत म्हणून त्यांनी गणेश उत्सव सरू केला

मंदिर संस्थाएक 
हलवाई गणपती
संस्था हि मिळालेल्या देणगीतून आणि त्या लोकांचा मदतीते  जे श्रीमान्तांपैकी एक आहेत त्यांचाकडून परोपकाराचे काम करते,हि संस्था वृद्धाश्रम चालवते ज्याचा नाव पिताश्री असून ते पुण्यातील कोंढवा या ठिकाणी आहे.हे घर १.५ करोड रुपयात बांधल गेलं असून मे २००३ मधे हे चालू करण्यात आलं.याच ठिकाणी संस्था ४० अनाथ मुलांना राहायला घर आणि शिक्षण पुरवते.
 गरिबांसाठी
रुग्णवाहिकेची सुविधा आणि आदिवासी भागात आरोग्य तपासणी केंद्र यासारख्या इतर सेवाही संस्था करते.
,

फुले वाडा

फुले  वाडा:-
        एकोणविसाव्या  शतकात  खूप  महत्व  आहे  . महात्मा  फुल्यांच राहत  घर  हे  १९९१  रोजी  राष्ट्रीय  स्मारक  म्हणून  घोषित  करण्यात  आले . या  वाड्यात  एकूण  ४  खोल्या  असून  पहिल्या  खोलीत  महात्मा  फुलेंचा  फोटो  लावण्यात  आला  आहे .राहिलेल्या  तीन  खोल्यात  नागपूरच्या  वसंत  आठवलेच्या  रंगीत  चित्रांचे  प्रदर्शन  आहे . त्यामध्ये  फुल्यांच्या  जीवनाशी  निगडीत  त्यंच  शिक्षण ,लग्न ,त्यांचे  हस्ताक्षर ,फोटोग्राफ्स ,पुस्तके  यांचे  प्रदर्शनांचा   समावेश  आहे .
       महात्मा  फुल्यांनी  सत्यशोधक  समाजाची  स्थापना  केली . त्यांची  एकोणविसाव्या  शतकातील  वाटचाल  चित्रातून  मांडण्यात  आली  आहे .
,

सावकार मेमोरिअल

सावकार मेमोरिअल :-
             स्वातंत्र्यवीर  सावरकरांनी  पुण्यातील  फर्गुसन  कॉलेज  मधे  शिक्षण  घेतले .१९०२  साली जेन्वा  लोकमान्य  टिळकांनी  स्वदेशीचा  नारा  दिला  तेंवा  सावरकरांनी  यात  सहभागी   होवून  मुला  मुठा  नदीच्या  किनार्यावर  विदेशी  कापध्यांची  होळी  केली  आणि  ब्रिटीश  विरोधी  भाषणे  केली . ह्या  घटनेला  स्वातंत्राच्या  लढ्यामध्ये  खूप  महत्व  आहे .ह्या  आठवणी  जपून  ठेवण्यासाठी  स्वातंत्र्यवीर  सावरकर  स्मारक  उभारले  आहे .
,

पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ:-
       विद्यापीठाचा   परिसर  अतिशय  सुरेख  असून  परिसरामध्ये   वेगवेगळ्या  झाडांची  तसेच  फुलझाडांची  लागवड  केलेली  आहे .
विद्यापीठाची  इमारत  हि  ब्रिटीशकालीन  असून  ती बॉम्बे  च्या  गवर्नर  साठी  बांधण्यात  आली . येथे  असणारा  दरबार  हाल हे  त्याकाळी  मोठमोठ्या  लोकाबारावबर  जसे  कि  राजे ,रावसाहेब, सरदार  यांच्या  बरोबर  होणार्या  मिटिंग  साठी  वापरले  जायचे .
विद्यापीठाची  इमारत  हि  कलापूर्ण  आणि  वैशिश्यापूर्ण  आहे .

,

सारस बाग

सारस बाग :-

         सारस बागेमध्ये   गणेश  मंदिर  असून  ,मंदिरात  गणपतीची  २  फुट  उंच  आणि पद्मासनात  बसलेली  ४  हातांची  सुरेख  मूर्ती   आहे .थोरले  बाजीराव  जेंव्हा  हैदर  अलीबरावबर  युद्धास  जाणार  होते  त्यापूर्वी  गणपती  त्यांच्या  स्वप्नात  आले  आणि  त्यांनी  पार्वतीच्या  पायथ्याला  मंदिर   बांधण्यास  सांगितले . त्यानुसार  थोरल्या  बाजीरावांनी    हे  मंदिर  बांधले .
पूर्वी  काळी  सततच्या  होणार्या  हल्ल्यामुळे  बागा  किंवा  प्राणीसंग्रहालये  यासारख्या  कल्पना  अस्तित्वात  नवत्या .
         परंतु  १७२०  -१७४०  काळात  थोरल्या  बाजीरावांनी  पहिले  प्राणीसंग्रहालय  पुण्यात  त्याकाळी  काढले .त्या  काळी  त्याला  “शिकारखाना  ” असे  म्हणत .रविवारी  सरस  बगे  मधे  खूप  गर्दी  असते .सुट्टीच्या  या  दिवसाचा  पुणेकर  पुरेपूर  फायदा  घेतात . तर  आठवड्याचे  सातही  दिवस  जोडप्यासाठी  सारस  बाग  हि  खास  पर्वणीच असते. सारस  बागेमध्ये  प्रवेश  फ्री  आहे .
       
,

राजीव गांधी प्राणीसंग्रहालय

राजीव गांधी प्राणीसंग्रहालय :-
          
कात्रज  मधील  राजीव  गांधी  प्राणीसंग्रहालय  हे  देशातील  पहिले  प्राणीसंग्रहालय  आहे  कि  जेथे  प्राण्याची  ओळख  हि  डिजिटल  स्वरुपात  केली  जाते .संग्रहालयात  विविध  जातीचे  साप  तसेच  मगरी  आहेत . तेथे  असलेल्या  सापांची  माहिती  तेथे  लावलेल्या  फलकावर  आपणास   पहावयास  मिळते . कात्रजचे   सर्प  उद्यान  हे  लहान  मुलांसाठी  खास  आकर्षण  आहे .

,

ओशो आश्रम

ओशो आश्रम:-
          पुण्यात  कोरेगाव  मधे  असणारा  हा  आश्रम आचार्य  रजनीश  यांनी  बनवला . आचार्य  रजनीश  हे  एक  आदर्श  व्यक्तिमत्व  होते .त्याच्या  अतिशय  महत्व  असलेल्या  पुस्तकाचं  आणि  कॅसेटचे   प्रदर्शन  दर  वर्षी  भरवलं  जाते . हे  एक  निसर्गरम्य  ठिकाण  असून  येथे  धाब्यांच  निर्मिती  करण्यात  आली   आहे .पर्यावरण  प्रेमींनी  येथे  नक्की  भेट  द्यावी.
          हा  आश्रम  सकाळी  ६  ते  ९  आणि  दुपारनंतर  ६  ते  ९  या  वेळेत  उपलब्ध  असतो .प्रवेश  फी  १०  रुपये  आहे .
,

महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी मंदिर :-
  वसंतराव  एकनाथ  बागुल  बाग  हि  पुणे  महानगरपालिकेच्या  मालीकीची   असून  ती सकाळी  ६ .००  ते  ११ .००  आणि  सायंकाळी  ४ .००  ते  ८ .३०  पर्यंत   चालू  असते .बागेमध्ये  ४५०  मीटरचा  जोग्गिंग  ट्रक  आहे .येथे  नवरात्रीच्या  काळात  यात्रा  भरते .बागेत  महालक्षमी  चे  सुंदर  असे  मंदिर  आहे .

,

लालमहाल

लाल महाल :-

             १९३०  साली  विजापूरच्या  आदिलशहाच्या  सैनिकांनी पुणे  शहर  उद्वस्त  केले . घरे   जाळली ,कितीतरी  लोक  मारले  गेले .त्यानंतर  काही  वर्षांनी  दादोजी   कोंडदेव  हे   ६  वर्षाच्या  शिवाजी  महाराजांना  आणि  जिजाबाईना घेवून  पुण्यात  आले . त्यांनी  झांबरे  पाटलाकडून  जमीन  घेवून  हा  वाद  बांधला . येथे  शिवाजी  महाराजांनी  आणि  जिजाबाईनि काही  काळ  वस्त्याव्य केले . ते  नेहमी  कसबा  पेठेतील गणपतीच्या  दर्शनास  जात  असत.

            शिवाजी  राजे  त्यानंतर  रेग्दल  राहण्यास  गेले . १६६० -६३  मधे   शाहितेखान   लालमहालात वास्त्यव्यास  होता .त्याला   हाकलून  देण्यसाठी  ६  एप्रिल  १६६३  साली  शिवाजी  महाराजांनी  लाल   महालावर  हल्ला  केला .त्यात  शाहिस्ते खानची  ३  बोटे  कापली  गेली ,तसेच  त्याचा  मुलगा  अबुल  फात्तेखानशहा  ५५  शत्रू  मारले  गेले . त्यानंतर    ८  एप्रिल  १६६३  ला  शाहिस्तेखानाने  लाल महालासह   पुणे  सोडलं . पुण्यावरील  सतत   होणाऱ्या हल्ल्यामुळे  लालमहाल  उद्वस्थ  झाला .

            आता   असलेला  हा  लालमहाल  पुणे  महानगरपालिकेने  बांधलेला  आहे .त्यामुळे  त्याला  शाहिस्तेखानाची  बोटे  कापलेली  खिडकी  नाही . पुणे  महानगरपालिकेने  हे  बांधकाम  १९८४  साली  सुरु  केले  तर  ते  १४  एप्रिल  १९८८  ला  पूर्ण  झाले .
राजकारणी  लोकातील  अंतर्गत  वादामुळे  लालमहाल  आपणास  फक्त  बाहेरुनच पाहता  येईल . हा  शनिवार  वाड्याजवळ  येतो .
,

चतुर्श्रुंगी मंदिर

चतुर्श्रुंगी मंदिर

            पुण्याच्या  उत्तरेला ,पुण्यापासून  ५ किमी  वरती  चातुश्रुन्गीची  टेकडी  आहे .येथे   चातुश्रुन्गीची   देवीचे   प्रसिद्ध  मंदिर   असून  त्याविषयी एक   अख्याएका   सांगितली  जाते . त्यानुसार  ,दुर्लभशेठ  नावाचे  पुण्याचे  व्यापारी  होते  ते  नित्य  नेमाने  नासिक  च्या  सप्तशृंगी  ची  यात्रा  करत  असत .  पण  नंतर  वय  वाढल्याने  त्यांना  ते  शक्य  होईना  झाले .एकेदिवशी  देवी  त्यांच्या  स्वप्नात  आली   आणि  तिने  पुण्याच्या  टेकडीवर  राहाण्याच  आश्वासन  दिल . त्यानुसार  दुर्लभशेठाणी १७८६  साली  हे  मंदिर  बांधल .
            मंदिर  हे  टेकडीवर  असून  जाण्यासाठी  पायऱ्या बांधण्यात  आल्या  आहेत .मंदिराचे  बांधकाम  अतिशय  सुरेख  आणि  सुंदर   आहे . मंगळवारी  आणि  शुक्रवारी  दर्शनासाठी  गर्दी  असते . नवरात्री  मधे  अश्विन  महिन्यात  येथे  मोठी  यात्रा  भरते .
,

आगाखान राजवाडा

आगाखान  राजवाडा हा  येरवड्यामधे  ,बंद  गार्डन पुलापासून १  ते  २  किमी  अंतरावर  पुणे – नगर  रोड  वर  येतो .आगाखान  राजवाड्याचे  १९  एकरावर  पसरलेला  असून  त्यापैकी  ७  एकर  जमीन  आगाखान  राजाने  १९६९  साली  गांधी   नतिओनल  मामोरीअल  ला  दिली .  आगाखान  राजवाडा हा  स्थापत्य्शात्राचा  उत्क्रष्ट  नमुना  आहे .

           ८ ऑगस्ट  १९४२  रोजी  महात्मा  गांधीनी  “भारत  छोडो ” चा नारा  दिला .त्यानंतर  महात्मा  गांधीना  अटक  करून  पुण्यात  आगाखान राजवाड्यामधे  ठेवण्यात आले .त्यानंतर २  ते  ४  दिवसांनी  कस्तुरबा  गांधीनी  मुंबई  मधे  आंदोलन  उभारलं  त्यामुळे  त्यांनादेखील  आगाखान  राजवाड्यामधे  आणण्यात  आले .महात्मा  गांधींचे  सचिव  महादेवभाई  देसाई  यांचे  हृदयविकाराने  १५  ऑग  १९४२  रोजी   निधन  झाले  . २२  फेब्रुवारी  १९४४  रोजी  कस्तुरबा  गांधीचे  देखील  निधन  झाले .त्यांची  समाधीस्थळे  राज्वाद्याच्यासमोर  आहेत . महात्मा  गांधी त्या  समाधींचे  दर्शन  घेतल्याशिवाय  जेवण  करत नसत.

          राजवाड्यामध्ये  ५  सभागृह  आहेत .स्वातंत्र्य  चळवळीचा  इतिहास   चित्राच्या   प्रदर्शनातून मांडण्यात  आला  आहे .गांधीजीनी  वापरलेल्या  वस्तू ,बेड ,डेस्क ,कपडे  येथे  काळजीपूर्वक  ठेवण्यात  आले  आहेत. हा  राजवाडा  वर्षातील  ४  दिवस  दिवाळी ,मोहरम ,धुलीवंदन  आणि  अनंतचतुर्दशी सोडून  सर्व  दिवशी  पाहण्यास  उपलब्ध  असतो . त्यासाठी  फक्त  ५  रुपये  शुल्क  आहे . स्वातंत्र्य लढ्याबद्दल  आपणास  जाणून  घ्यायचं  असल्यास  एकदा  तरी  नक्की  भेट  द्या .हि  माहिती  खास  मेड  इन  पुणे  च्या  वाचकासाठी ..आवडल्यास  नक्की  शेअर  करा ..आम्हाला  आपल्या  प्रतिसादाची  आवश्यकता  आहे .

आम्हाला पाठवा

आपण पुण्यात राहत असताना आपणास आलेल्या अडचणी,घडलेले प्रसंग आपण आम्हाला पाठवू शकता,
तसेच आपल्याकडे काही लेख,फोटो असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते आम्ही आपल्या नावासहित प्रसिद्ध करू.
आपले पुण्याविषयी असलेले मत आपण madeinpune@gmail.com या मेल वरती पाठवू शकता.
तसेच आपल्याला काही बदल सुचवायचे असल्यास तेही सुचवू शकता.
त्यासाठी येथे टिचकी मारा.

आम्ही कोण?

आम्ही कोण?
मेड इन पुणेच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार..!
आज मराठी भाषेचा वापर सगळीकडे सर्रास होत असताना,
संसाकृतिक वारसा असलेल्या पुणे शहराबद्दल आणि परीसराबद्दलची माहिती मराठीत उपलब्ध असू नये याच आचार्य वाटत....
हीच खंत घेवून हा केलेला खटाटोप...तुम्हाला नक्की आवडेल हि आशा...

तसेच आपल्याकडे काही लेख,फोटो असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते आम्ही आपल्या नावासहित प्रसिद्ध करू.
आपले पुण्याविषयी असलेले मत आपण madeinpune@gmail.com या मेल वरती पाठवू शकता.
तसेच आपल्याला काही बदल सुचवायचे असल्यास तेही सुचवू शकता.
त्यासाठी येथे टिचकी मारा.

, ,

तोरणा


तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा राजगड आहेत. दुसर्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण खरीव खिंडी आहेत.

इतिहास:-
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.

हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. ..१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला. पुढे ..१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला लढाई करून आपल्या ताब्यात आणला याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.


, , ,

सिंहगड


पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे .. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे .. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला.
सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळच्या सैन्याने हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव सिंहगड असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.
सिंहगडाची लढाई:-
या युध्दाबाबत सभासद बखरीत खालील उल्लेख आढळतो:
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.
गडावरील ठिकाणे:-
दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळकयेत असत. १९१५ साली महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
कोंढाणेश्र्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
श्री अमृतेश्र्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्र्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्र्वराचे प्राचीन मंदिरलागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव भैरवी अशा दोन मुरत्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यासयेत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यासह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती माहूत अशी दगडी शिल्पे होती.श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून याबुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचेखोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी.मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणा-या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि. मार्चइ..१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
तानाजीचे स्मारक : अमृतेश्र्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिध्द तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्यावतीने हे बांधण्यात आले आहे. माघ नवमी दि. फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईततानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.
गडावर जाण्याच्या वाटा
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरु मैदानाकडून जाणारा हा रस्ता अंदाजे ३५ कि.मी. आहे.
मार्ग
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.
स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी उपलब्ध असतात.