Showing posts with label पुणे दर्शन. Show all posts
Showing posts with label पुणे दर्शन. Show all posts
पार्वती, पुणे दर्शन
पार्वती
पार्वती:-
पार्वती हे पुण्यातील सर्वात उंच ठिकाण असून येथून आपण सर्व पुणे पाहू शकतो .रात्रीच्या वेळी तर हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते .पार्वती वरील मंदिरे हे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना आहे .हे एक पुण्याच्या गर्दीपासून दूर शांत असे ठिकाण असून पुणेकरासाठी अशी ठिकाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. पर्वतीला एकूण १०३ पायऱ्या असून पुण्यातील काही नागरिक येथे दररोज व्यायामासाठी साठी येतात. येथे देवेश्वराचे मंदिर असून ,कार्तिकेय ,विष्णू आणि विठठलाचे देखील मंदिरे आहेत . त्याचबरोबर पेशवांच्या इतिहास सांगणारे १ संग्रालय देखील आहे.त्यासाठी ५ रुपये अशी नाममात्र प्रवेश फी आहे .
संग्रलायाच्या बाजूलाच श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे समाधी स्थान आहे ज्यांनी येथे शेवटचा श्वास घेतला .सर्व गोंगाटापासून शातंता आणि रात्रीच्या वेळी विलोभनीय दिसणारे पुण्याचे दृश्य , हे सगळ पाहायचं असेलतर पार्वतीला नक्की भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा
पुणे दर्शन, शनिवार वाडा
शनिवार वाडा:-
शनिवार वाडा ही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आहे. हे महाराष्ट्राचे पंतप्रधान श्रीमंत पेशवे यांचे निवासस्थान होते.
शनिवार वाडा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी बांधला.त्याच्या बांधकामाची सुरूवात जानेवारी १०, १७३० रोजी झाली. श्रीमंतांनी स्वत: लाल महालातून माती आणून त्याची पायाभरणीची सुरूवात केली. बांधकाम वेगाने करण्यात आले. अखेर तत्कालीन १६,०१० रुपये खर्चून, शनिवार वाड्याचे बांधकाम जानेवारी २२, १७३२ रोजी पूर्ण झाले.
हा वाडा बांधण्यासाठी हीच जागा निवडण्यासंबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा एक ससा त्या ठिकाणी एका कुत्र्याचा पाठलाग करतांना बाजीराव पेशव्यांच्या दृष्टीस पडला त्यांना तो शुभ शकुन वाटला. येथे वाडा बांधल्यास केव्हाही पराभवास सामोरे जावे लागणार नाही असे समजून त्यांनी हा निर्णय घेतला. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे मूळच्या स्वरूपातील वाडा आपण पाहू शकत नाही. या वाड्याच्या चौथर्यावर बसविलेल्या छोट्या फलकावरून एकेकळी येथे असलेल्या गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, दिवाणखाना, कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.
जेव्हां श्रीमंत शाहू महाराजांना कळले की पेशवे पुण्यात मोठा किल्लेवजा वाडा बांधत आहेत, तेव्हा त्यांच्या सरदारांना भीती वाटली की पेशवे शिरजोर होऊ पहात आहेत. तेव्हा शाहू महाराजांनी पेशव्यांना लिहिले की तट मातीचे नाही, छातीचे करायचे असतात.
शनिवारवाड्याचे अंतरंग:-
शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते.
सौजन्य:- www.wikipedia.com
शनिवार वाडा

दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे दर्शन
दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यात भारतातील एका हिंदू देव गणपती बाप्पा यांना समर्पित केले आहे.हे मंदिर ऐतिहासिक शनिवारवाडा किल्ल्यापासून खूपच जवळ असून हा वाडा मराठा पेशावांचे प्रशासक मुख्यालय होते.हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मंदिर असून या ठिकाणी दूर दूरवरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात.मोठमोठ्या हस्ती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दर वर्षी या ठिकाणी गणेश उत्सवाचा वेळी भेट देतात.मुख्य गणपतीची मूर्ती वर १ करोड रुपयाची आहे.
मंदिराचा इतिहास
१८९३ मधे,दगडूशेठ हलवाई नावाचा एक श्रीमंत मिठाई विक्रेत्याकडून या मंदिराची स्थापना करण्यात आली.हलवाईचा मुलगा त्याचा आधीचा वर्षी हरवला होता त्यनंतर त्यांचा गुरूचा अद्येनुसार त्यांनी गणपती आणि दत्ताचा मूर्तींची स्थापना केली.त्यानंतर त्यांनी हलवाई गणपती संस्थेची स्थापना केली.बाल गंगाधर टिळक यांनी इंग्रजांचा काळात सर्व लोक एकत्र यावेत म्हणून त्यांनी गणेश उत्सव सरू केला
मंदिर संस्थाएक
हलवाई गणपती संस्था हि मिळालेल्या देणगीतून आणि त्या लोकांचा मदतीते जे श्रीमान्तांपैकी एक आहेत त्यांचाकडून परोपकाराचे काम करते,हि संस्था वृद्धाश्रम चालवते ज्याचा नाव पिताश्री असून ते पुण्यातील कोंढवा या ठिकाणी आहे.हे घर १.५ करोड रुपयात बांधल गेलं असून मे २००३ मधे हे चालू करण्यात आलं.याच ठिकाणी संस्था ४० अनाथ मुलांना राहायला घर आणि शिक्षण पुरवते.
गरिबांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा आणि आदिवासी भागात आरोग्य तपासणी केंद्र यासारख्या इतर सेवाही संस्था करते.

पुणे दर्शन, फुले वाडा
फुले वाडा
फुले वाडा:-
एकोणविसाव्या शतकात खूप महत्व आहे . महात्मा फुल्यांच राहत घर हे १९९१ रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले . या वाड्यात एकूण ४ खोल्या असून पहिल्या खोलीत महात्मा फुलेंचा फोटो लावण्यात आला आहे .राहिलेल्या तीन खोल्यात नागपूरच्या वसंत आठवलेच्या रंगीत चित्रांचे प्रदर्शन आहे . त्यामध्ये फुल्यांच्या जीवनाशी निगडीत त्यंच शिक्षण ,लग्न ,त्यांचे हस्ताक्षर ,फोटोग्राफ्स ,पुस्तके यांचे प्रदर्शनांचा समावेश आहे .
महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली . त्यांची एकोणविसाव्या शतकातील वाटचाल चित्रातून मांडण्यात आली आहे .
पुणे दर्शन, सावकार मेमोरिअल
सावकार मेमोरिअल
सावकार मेमोरिअल :-
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यातील फर्गुसन कॉलेज मधे शिक्षण घेतले .१९०२ साली जेन्वा लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा नारा दिला तेंवा सावरकरांनी यात सहभागी होवून मुला मुठा नदीच्या किनार्यावर विदेशी कापध्यांची होळी केली आणि ब्रिटीश विरोधी भाषणे केली . ह्या घटनेला स्वातंत्राच्या लढ्यामध्ये खूप महत्व आहे .ह्या आठवणी जपून ठेवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उभारले आहे .
पुणे दर्शन, पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठ:-
विद्यापीठाचा परिसर अतिशय सुरेख असून परिसरामध्ये वेगवेगळ्या झाडांची तसेच फुलझाडांची लागवड केलेली आहे .
विद्यापीठाची इमारत हि ब्रिटीशकालीन असून ती बॉम्बे च्या गवर्नर साठी बांधण्यात आली . येथे असणारा दरबार हाल हे त्याकाळी मोठमोठ्या लोकाबारावबर जसे कि राजे ,रावसाहेब, सरदार यांच्या बरोबर होणार्या मिटिंग साठी वापरले जायचे .
विद्यापीठाची इमारत हि कलापूर्ण आणि वैशिश्यापूर्ण आहे .
पुणे दर्शन, सारस बाग
सारस बाग
सारस बाग :-
सारस बागेमध्ये गणेश मंदिर असून ,मंदिरात गणपतीची २ फुट उंच आणि पद्मासनात बसलेली ४ हातांची सुरेख मूर्ती आहे .थोरले बाजीराव जेंव्हा हैदर अलीबरावबर युद्धास जाणार होते त्यापूर्वी गणपती त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी पार्वतीच्या पायथ्याला मंदिर बांधण्यास सांगितले . त्यानुसार थोरल्या बाजीरावांनी हे मंदिर बांधले .
पूर्वी काळी सततच्या होणार्या हल्ल्यामुळे बागा किंवा प्राणीसंग्रहालये यासारख्या कल्पना अस्तित्वात नवत्या .
परंतु १७२० -१७४० काळात थोरल्या बाजीरावांनी पहिले प्राणीसंग्रहालय पुण्यात त्याकाळी काढले .त्या काळी त्याला “शिकारखाना ” असे म्हणत .रविवारी सरस बगे मधे खूप गर्दी असते .सुट्टीच्या या दिवसाचा पुणेकर पुरेपूर फायदा घेतात . तर आठवड्याचे सातही दिवस जोडप्यासाठी सारस बाग हि खास पर्वणीच असते. सारस बागेमध्ये प्रवेश फ्री आहे .
पुणे दर्शन, सर्प उद्यान
कात्रज मधील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय हे देशातील पहिले प्राणीसंग्रहालय आहे कि जेथे प्राण्याची ओळख हि डिजिटल स्वरुपात केली जाते .संग्रहालयात विविध जातीचे साप तसेच मगरी आहेत . तेथे असलेल्या सापांची माहिती तेथे लावलेल्या फलकावर आपणास पहावयास मिळते . कात्रजचे सर्प उद्यान हे लहान मुलांसाठी खास आकर्षण आहे .
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय

ओशो आश्रम, पुणे दर्शन
ओशो आश्रम
ओशो आश्रम:-
पुण्यात कोरेगाव मधे असणारा हा आश्रम आचार्य रजनीश यांनी बनवला . आचार्य रजनीश हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते .त्याच्या अतिशय महत्व असलेल्या पुस्तकाचं आणि कॅसेटचे प्रदर्शन दर वर्षी भरवलं जाते . हे एक निसर्गरम्य ठिकाण असून येथे धाब्यांच निर्मिती करण्यात आली आहे .पर्यावरण प्रेमींनी येथे नक्की भेट द्यावी.
हा आश्रम सकाळी ६ ते ९ आणि दुपारनंतर ६ ते ९ या वेळेत उपलब्ध असतो .प्रवेश फी १० रुपये आहे .
पुणे दर्शन, लालमहाल
लालमहाल
१९३० साली विजापूरच्या आदिलशहाच्या सैनिकांनी पुणे शहर उद्वस्त केले . घरे जाळली ,कितीतरी लोक मारले गेले .त्यानंतर काही वर्षांनी दादोजी कोंडदेव हे ६ वर्षाच्या शिवाजी महाराजांना आणि जिजाबाईना घेवून पुण्यात आले . त्यांनी झांबरे पाटलाकडून जमीन घेवून हा वाद बांधला . येथे शिवाजी महाराजांनी आणि जिजाबाईनि काही काळ वस्त्याव्य केले . ते नेहमी कसबा पेठेतील गणपतीच्या दर्शनास जात असत.
शिवाजी राजे त्यानंतर रेग्दल राहण्यास गेले . १६६० -६३ मधे शाहितेखान लालमहालात वास्त्यव्यास होता .त्याला हाकलून देण्यसाठी ६ एप्रिल १६६३ साली शिवाजी महाराजांनी लाल महालावर हल्ला केला .त्यात शाहिस्ते खानची ३ बोटे कापली गेली ,तसेच त्याचा मुलगा अबुल फात्तेखानशहा ५५ शत्रू मारले गेले . त्यानंतर ८ एप्रिल १६६३ ला शाहिस्तेखानाने लाल महालासह पुणे सोडलं . पुण्यावरील सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे लालमहाल उद्वस्थ झाला .
आता असलेला हा लालमहाल पुणे महानगरपालिकेने बांधलेला आहे .त्यामुळे त्याला शाहिस्तेखानाची बोटे कापलेली खिडकी नाही . पुणे महानगरपालिकेने हे बांधकाम १९८४ साली सुरु केले तर ते १४ एप्रिल १९८८ ला पूर्ण झाले .
राजकारणी लोकातील अंतर्गत वादामुळे लालमहाल आपणास फक्त बाहेरुनच पाहता येईल . हा शनिवार वाड्याजवळ येतो .
चतुर्श्रुंगी मंदिर, पुणे दर्शन
चतुर्श्रुंगी मंदिर
चतुर्श्रुंगी मंदिर
पुण्याच्या उत्तरेला ,पुण्यापासून ५ किमी वरती चातुश्रुन्गीची टेकडी आहे .येथे चातुश्रुन्गीची देवीचे प्रसिद्ध मंदिर असून त्याविषयी एक अख्याएका सांगितली जाते . त्यानुसार ,दुर्लभशेठ नावाचे पुण्याचे व्यापारी होते ते नित्य नेमाने नासिक च्या सप्तशृंगी ची यात्रा करत असत . पण नंतर वय वाढल्याने त्यांना ते शक्य होईना झाले .एकेदिवशी देवी त्यांच्या स्वप्नात आली आणि तिने पुण्याच्या टेकडीवर राहाण्याच आश्वासन दिल . त्यानुसार दुर्लभशेठाणी १७८६ साली हे मंदिर बांधल .
मंदिर हे टेकडीवर असून जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत .मंदिराचे बांधकाम अतिशय सुरेख आणि सुंदर आहे . मंगळवारी आणि शुक्रवारी दर्शनासाठी गर्दी असते . नवरात्री मधे अश्विन महिन्यात येथे मोठी यात्रा भरते .
आगाखान राजवाडा, पुणे दर्शन
आगाखान राजवाडा
आगाखान राजवाडा हा येरवड्यामधे ,बंद गार्डन पुलापासून १ ते २ किमी अंतरावर पुणे – नगर रोड वर येतो .आगाखान राजवाड्याचे १९ एकरावर पसरलेला असून त्यापैकी ७ एकर जमीन आगाखान राजाने १९६९ साली गांधी नतिओनल मामोरीअल ला दिली . आगाखान राजवाडा हा स्थापत्य्शात्राचा उत्क्रष्ट नमुना आहे .
८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधीनी “भारत छोडो ” चा नारा दिला .त्यानंतर महात्मा गांधीना अटक करून पुण्यात आगाखान राजवाड्यामधे ठेवण्यात आले .त्यानंतर २ ते ४ दिवसांनी कस्तुरबा गांधीनी मुंबई मधे आंदोलन उभारलं त्यामुळे त्यांनादेखील आगाखान राजवाड्यामधे आणण्यात आले .महात्मा गांधींचे सचिव महादेवभाई देसाई यांचे हृदयविकाराने १५ ऑग १९४२ रोजी निधन झाले . २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबा गांधीचे देखील निधन झाले .त्यांची समाधीस्थळे राज्वाद्याच्यासमोर आहेत . महात्मा गांधी त्या समाधींचे दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नसत.
राजवाड्यामध्ये ५ सभागृह आहेत .स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास चित्राच्या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे .गांधीजीनी वापरलेल्या वस्तू ,बेड ,डेस्क ,कपडे येथे काळजीपूर्वक ठेवण्यात आले आहेत. हा राजवाडा वर्षातील ४ दिवस दिवाळी ,मोहरम ,धुलीवंदन आणि अनंतचतुर्दशी सोडून सर्व दिवशी पाहण्यास उपलब्ध असतो . त्यासाठी फक्त ५ रुपये शुल्क आहे . स्वातंत्र्य लढ्याबद्दल आपणास जाणून घ्यायचं असल्यास एकदा तरी नक्की भेट द्या .हि माहिती खास मेड इन पुणे च्या वाचकासाठी ..आवडल्यास नक्की शेअर करा ..आम्हाला आपल्या प्रतिसादाची आवश्यकता आहे .
Subscribe to:
Posts (Atom)