Showing posts with label शनिवार वाडा. Show all posts
Showing posts with label शनिवार वाडा. Show all posts
,

शनिवार वाडा


 शनिवार वाडा:-

शनिवार वाडा ही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आहे. हे महाराष्ट्राचे पंतप्रधान श्रीमंत पेशवे यांचे निवासस्थान होते.

शनिवार वाडा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी बांधला.त्याच्या बांधकामाची सुरूवात जानेवारी १०, १७३० रोजी झाली. श्रीमंतांनी स्वत: लाल महालातून माती आणून त्याची पायाभरणीची सुरूवात केली. बांधकाम वेगाने करण्यात आले. अखेर तत्कालीन १६,०१० रुपये खर्चून, शनिवार वाड्याचे बांधकाम जानेवारी २२, १७३२ रोजी पूर्ण झाले.

हा वाडा बांधण्यासाठी हीच जागा निवडण्यासंबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा एक ससा त्या ठिकाणी एका कुत्र्याचा पाठलाग करतांना बाजीराव पेशव्यांच्या दृष्टीस पडला त्यांना तो शुभ शकुन वाटला. येथे वाडा बांधल्यास केव्हाही पराभवास सामोरे जावे लागणार नाही असे समजून त्यांनी हा निर्णय घेतला. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे मूळच्या स्वरूपातील वाडा आपण पाहू शकत नाही. या वाड्याच्या चौथर्यावर बसविलेल्या छोट्या फलकावरून एकेकळी येथे असलेल्या गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, दिवाणखाना, कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.

जेव्हां श्रीमंत शाहू महाराजांना कळले की पेशवे पुण्यात मोठा किल्लेवजा वाडा बांधत आहेत, तेव्हा त्यांच्या सरदारांना भीती वाटली की पेशवे शिरजोर होऊ पहात आहेत. तेव्हा शाहू महाराजांनी पेशव्यांना लिहिले की तट मातीचे नाही, छातीचे करायचे असतात.

शनिवारवाड्याचे अंतरंग:-

शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते.

सौजन्य:- www.wikipedia.com